४०० किलो अ‍ॅल्युमिनियम तार चोरीला

06 Jan 2026 21:45:00
वर्धा, 
aluminum-wire-stolen : इलेट्रिक खांबांवरील टाकलेला अंदाजे ४०० किलो वजनाचा अ‍ॅल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना खरांगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरांगणा घाट ते तळेगाव (रघुजी) येथे २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी ५ जानेवारी रोजी खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
 

k 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नंदलाल गिराळे (३३) रा. राजनी ता. कारंजा (घा.) हे ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांना जून २०२५ मध्ये कंपनीने मोरांगणा घाट ते तळेगाव रघुजीदरम्यान इलेट्रीक पोल व अ‍ॅल्यूमिनियम तार टाकण्याचे काम दिले होते. कंपनीने दिलेल्या कामानुसार मोरांगणा घाट ते तळेगाव रघुजी दरम्यान २७ इलेट्रीक खांब उभे करून त्यावर तीन पदरी अ‍ॅल्यूमिनियम तार टाकलेली होती. तार जोडणीचे काम ऑटोबर २०२५ मध्ये पूर्ण झाले होते. परंतु, अद्याप त्यावर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नव्हता.
 
 
२६ नोव्हेंबर रोजी नंदलाल गिराळे यांच्यासह मजुरांनी मोरांगणा घाट ते तळेगाव रघुजी दरम्यान लावण्यात आलेल्या इलेट्रीक खांबांवरील तारांची पाहणी केली असता अ‍ॅल्युमिनियम तार सुस्थितीत लागून होते. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी पुन्हा पाहणी केली असता मोरांगणा घाट ते तळेगाव रघुजी दरम्यान २७ इलेट्रीक खांबांवरील अंदाजे ४०० किलोग्रॅम वजनाचे ४० हजारांचा अ‍ॅल्यूमिनियम तारा दिसून आल्या नाही. पाहणी केली असता त्या कापून नेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कंपनीला माहिती दिली. याप्रकरणी नंदलाल गिराळे यांच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0