दारव्ह्यातील प्रभाग क्र. 2 भाजपा, शिवसेनेचाच बालेकिल्ला

06 Jan 2026 19:03:14
निवडणूक विश्लेषण
सतीश पापळकर
दारव्हा  
darwha-bjp-shiv-sena : नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूकीत प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपाचे धनंजय बलखंडे तसेच शिवसेनेच्या पल्लवी वाकोडे या मोठ्या फरकाने निवडून येत प्रभाग क्र. 2 मध्ये पुन्हा एकदा भाजपा, शिवसेनेचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
 


ytl 
 
 
 
प्रभाग क्र. 2 म्हणजे प्रामुख्याने नातूवाडी हा जुना भाग, स्वामी समर्थ नगर, महावीर कॉलनी, टेलिफोन कार्यालयासमोरील काही भाग असा मोठा भाग येतो. या परिसरात नवीन लेआऊटमध्ये शहरातील विस्तारित कुटुंबातील नवीन घरांसह नव्याने स्थायिक झालेली मोठी घरे आहेत. शहराची विशेष ओळख असलेल्या नातूवाडी या भागात बहुसंख्य नामांकित शैक्षणीक संस्था, आध्यात्मिक केंद्रे आहेत. शिवाय पालकमंत्री संजय राठोड यांचे दारव्ह्यातील निवासस्थान सुद्धा याच परिसरात आहे.
 
 
यापूर्वी पालीकेत अनेक दिग्गजांनी या भागातून प्रतिनिधीत्व केले आहे. यात काही दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे येथील निवडणूक कायम चर्चेचा विषय ठरत असते. नुकत्याच पालीका निवडणूकीत सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढल्याने युती, आघाडी नव्हती. त्यामुळे राजकीय पक्षांना आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची संधी होती.
 
 
या भागात भाजपा व शिवसेना या पक्षांचे वर्चस्व दिसत होते. यंदाच्या निवडणूकीत भाजपा, शिवसेना वेगवेगळे लढल्याने उमेदवारांसह मतदारांच्या सुद्धा मनात संभ्रमावस्था होती. परंतू प्रभागातील मतदार राजाने एक जागा भाजपाच्या तर दुसरी जागा शिवसेनेच्या पारड्यात टाकून राजकीय पक्ष वेगवेगळे लढले तरी आम्ही मात्र महायुतीच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. अन्य पक्षाने घेतलेली मते देखील निर्णायक होती. मुख्यतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गट, तसेच भाजपा, शिवसेना यांनी आपआपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.
 
 
सर्वच उमेदवार तुल्यबळ व जनसंपर्क असणारे होते. यावेळीही क्रॉस व्होटींग मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप व शिवसेना यांचे उमेदवार निवडून आले. विशेष बाब म्हणजे निवडून आलेले दोन्ही नगरसेवक हे पूर्वी याच भागातील नगरसेवक राहिलेल्या कुटुंबातील व दांडगा जनसंपर्क असलेले आहेत.
 
 
या प्रभागातील भाजपाचे विजयी उमेदवार पूर्व शहराध्यक्ष धनंजय बलखंडे हे रा. स्व . संघ परिवारातील असून रा. स्व. संघाचे पुर्व तालुका संघचालक स्व. वासुदेव बलखंडे यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांची वहिनी प्रिती बलखंडे या नप उपाध्यक्ष होत्या. तर दुसèया याच प्रभागातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार पल्लवी प्रशांत वाकोडे याच प्रभागातून पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0