बावनकुळे यांच्या प्रचार सभेत बंडखोरांनी घातला गोंधळ!

07 Jan 2026 21:03:27
चंद्रपूर,
chandrashekhar-bawankule : महानगर पालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवार, 7 जानेवारी रोजी चंद्रपूर येथे तीन वेगवेळ्या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा होत्या. त्यातील दोन सभेत भाजपाकडून उमेदवारी न मिळालेल्या बंडखोरांनी गोंधळ घातला. सपना टॉकीज चौकातील सभेत तर बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच बंडखोर राकेश बोमनवार हे मंचावरर चढले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आ. किशोर जोरगेवार यांनी त्यांना मंचाखाली नेले.
 
 
K
 
अचानक मंचावर चढलेल्या बंडखोर राकेश बोमनवार यांनी मंचावरून आपल्याला बोलू द्यावे अशी मागणी केली. शेवटी खाली उरवून कार्यकर्त्यांना त्यांना हाकलून लावले. तर दुसर्‍या सभेत सभागृहाबाहेर ‘एबी फार्म चोर’, ‘200 युनिट चोर’ अशा घोषणा देऊन बंडखोरांनी आपला रोष व्यक्त केला.
 
 
सकाळी 11 वाजता जटपूरा गेट प्रभागाच्या उमेदवार छबू वैरागडे, रवी लोणकर यांच्यासह इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी बावनकुळे यांची जाहीर सभा सपना टॉकीज चौकात सुरू होती. बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानच, या प्रभागातून भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राकेश बोमनवार यांनी थेट मंचावर चढले. अपक्ष उमेदवार मंचावर आल्याचे बघून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना तिथेच थांबविले. मात्र, बोमनवार यांनी बावणकुळे यांच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. तेव्हा आमदार जोरगेवार यांनी बोमनवार याचा हात पकडून खाली उतरविले. त्यामुळे सभेत काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी बोमनवार यांना मंचाच्या मागे नेत धक्काबुक्की केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.
 
इंदिरा नगर येथे सभास्थळी घोषणाबाजी
 
 
सायंकाळी इंदिरा नगर येथे बावनकुळे यांची सभा होती. त्यावेळीही बावनकुळे यांचे भाषण सुरू असताना नाराज भाजपा कार्यकर्ता मनोज पोतराजे याने आपल्या समर्थकांसह मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला व ‘एबी फार्म चोर’ आणि ‘200 युनिट चोर है’ अशा घोषणा देवून गोंधळ घातला. एकीकडे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच या घोषणा सुरू झाल्याने तेक्षे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, बावनकुळे यांना या घोषणाबाजीमुळे तिथून परतताना वाहनाचा मार्ग बदलावा लागला.
Powered By Sangraha 9.0