थंड वार्‍यांमुळे तापमानात घट; नागपूरचा पारा ८.०

07 Jan 2026 21:36:45
नागपूर,
nagpur-temperature : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका कायम आहे. विशेषतः नागपूर आणि गोंदियासारख्या जिल्ह्यात शीतलहरीचा जोर असल्याने नागपूरचा पारा बुधवारी ८.० अंशावर होता. तर गोंदिया ७.६ अंश सेल्सिअस नोंदविले. हवामान विभागाच्या माहितीनुसार १४ १६ जानेवारीच्या दरम्यान तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

KL
उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरल्यानंतर आता त्याचा प्रभाव मध्यवर्ती नागपूर शहरात जाणवू लागला आहे. उत्तर भारतात पारा थंडीची लाट नागपूरात येते. मंगळवारी गोंदिया आणि नागपूरात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नागपूरचा पारा ७.६ अंश सेल्सिअस पर्यंत घसरला होता. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0