भटक्या कुत्र्यांना रोखण्याची जबाबदारी आता शिक्षकांकडे

07 Jan 2026 19:43:49
तभा वृत्तसेवा
वणी, 
stray-dogs-teachers : शाळेच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी घेण्यास काही शिक्षकांनी विरोध केला आहे.
 
 
 
KJK
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, भटक्या कुत्र्यांना शालेय परिसरात येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक शाळेतील एका शिक्षकावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. शिक्षकांना या आधीच निवडणूक, जनगणना, केंद्रस्तर मतदान अधिकारी, असाक्षरांना साक्षर करण्यासाठी सुरू असलेल्या अभियानांतर्गत वर्गावर नियंत्रण ठेवणे. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, या कामासोबत अभ्यासाव्यतिरिक्त दर महिन्याला शासनाकडून आदेशित पंधरवडे साजरे करावे लागतात.
 
 
या सर्व कामात त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे व मुलांच्या अभ्यासाकडे कधी लक्ष द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोणताही नवीन उपक्रम राबवायचा म्हटले की ते भार शिक्षावरच टाकायचा, असा अलिखित नियम होऊन बसला आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0