सिंदीरेल्वे,
dahegaon-kabaddi-competition : नजिकच्या दहेगाव येथील विठ्ठल रुमिणी देवस्थान परिसरात महाकाल स्पोर्टिंग लबच्या वतीने आयोजित ५२ किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेचे विजेतापद पळसगावच्या ट्रिपल एस.के. संघाने पटकावले. उपविजेता जुनोना येथील चमू ठरली.
मंगळवारी सायंकाळी हेलोडीचे सरपंच सागर भगत, डॉ. सुरेश धंदरे यांच्या हस्ते पळसगावच्या चमुला १०,००१ रुपयांचे प्रथम पारितोषिक आ. कुणावार पुरस्कृत आणि पवार बंधूंकडून १०५१ रुपये रोख प्रदान करण्यात आले. जुनोना स्पोर्टिंग लबला ७००१ रुपये रोख व वैयक्तिक तृतीय पारितोषिक केळझरच्या संघाला ५००१ रुपये शिवाय आयोजक मंडळ महाकाल स्पोर्टिंग लब दहेगाव (गो.) चमुला प्रोत्साहनपर ३००१रुपये देण्यात आले.