वर्धा,
electronic-equipment-stolen : सेवाग्राम येथील एमआयडीसीमधील गोडावूनमधून नोकरानेच एलईडी टीव्ही, होमथिएटर असा ४ लाख ८६ हजार ६९० रुपयांचे इलेट्रॉनिक साहित्याचा अपहार केल्याची तक्रार सूरज बलवाणी यांनी सेवाग्राम पोलिसात दिली असून पोलिसांनी नोकर अभिषेक बुद्धे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित फोटो
झुलेलाल कॉलनी येथील सूरज बलवाणी (३३) यांचे बडे चौकात मनीषा इलेट्रॉनिस दुकान आहे. त्याच्याकडे सोनी कंपनीची डिलरशिप व एल. जी. हायर, डायकिन, आय. एफ. बी. या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप आहे. त्यामुळे इलेट्रॉनिस साहित्य ठेवण्यासाठी त्यांचे सेवाग्राम येथील एमआयडीसीमध्ये गोडावून आहे. बलवाणी यांच्याकडे म्हसाळा येथील अभिषेक बुद्ध हा नोकर म्हणून कामाला आहे. दरम्यान, बलवाणी यांनी १७ डिसेंबर रोजी गोडावूनमधील इलेट्रॉनिस वस्तूंचे आवक-जावक रजिस्टर, पर्चेस बिल व इलेट्रॉनिस वस्तू तपासल्या असता गोडावूनमधून एक एलजी कंपनीचा ५५ इंची टी.व्ही., १ सोनी कंपनीचा एल. ई.डी. ५५ इंच टि.व्ही. १ सोनी कंपनीचा ५५ इंची एल. ई. डी., ४ सोनी कंपनीची एल. ई.डी. ४३ इंची टि. व्ही., १ एल. जी. कंपनीचा होमथिएटर असा ४ लाख ८६ हजार रुपयांचे इलेट्रॉनिक साहित्याचा नोकर अभिषेक बुद्धे याने अपहार केल्याचा संशय आला. दरम्यान, सुरज बलवाणी यांनी सेवाग्राम पोलिस ठाणे गाठून अभिषेक विरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.