हर्षवर्धन सपकाळांना मानसिक उपचाराची गरज

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टिका

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
chandrashekhar-bawankule : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नगर पालिका निवडणुकीतील कामगिरी बघता त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची शक्यता आहे. पद वाचविण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध बोलत असतात. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिका केली. यापुढे सपकाळ जिथे अशाप्रकारचे वक्तव्य करतील त्या जिल्हयातील भाजपचे कार्यकर्ते त्यांची दखल घेतील असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
 
ZDG
 
महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भारतीय जनता पक्षाचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीस आता देवाभाऊ नाही टक्काभाऊ झाले आहेत असा आरोप केला होता, त्यास प्रत्यूत्तर देत ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, सपकाळ यांच्या कार्यकाळात काँग्रेसची सर्वच ठीकाणी अधोगती होत आहे. नगर पालिका निवडणुकीत हा पक्ष सिंगल डिजीटवर आला आहे. त्यांची ही प्रगती बघता त्यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. ते पद वाचविण्यासाठी सपकाळ टीका करीत आहेत. या टीकांचे व्हीडीओ ते राहूल गांधीना पाठवून खुष करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
 
ते पुढे म्हणाले, वास्तविकतः त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. त्यांची टीका म्हणजे सुर्यावर थूंकण्यासारखे आहे. यापुढे त्यांनी स्वतःला आवर घातला नाही तर ते ज्या जिल्हयात बोलतील तेथील भाजपचे कार्यकर्ते त्यांची दखल घेतील असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेस खासदार अनिल बोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, प्रवीण पोटे, शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.