सरकारी नोकरीची मोठी संधी! मिळणार 'लाखो रुपये पगार'

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
मुंबई ,
Hindustan Copper Limited recruitment सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारची कंपनी असलेल्या हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (एचसीएल) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे चांगल्या संधीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
 

Hindustan Copper Limited recruitment 
एचसीएलमध्ये सध्या सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट, असोसिएट सब्जेक्ट एक्सपर्ट तसेच मेडिकल प्रोफेशनल अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट (मायनिंग व एनवायरमेंट) या पदांसाठी दोन जागा उपलब्ध असून सब्जेक्ट एक्सपर्ट (मायनिंग) आणि असोसिएट सब्जेक्ट एक्सपर्ट (जिओलॉजी) यासाठी प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. याशिवाय असिस्टंट सब्जेक्ट एक्सपर्ट (ऑफिशियल लँग्वेज) आणि मेडिकल प्रोफेशनल पदासाठीही भरती केली जाणार आहे.
 
 
या पदांसाठी Hindustan Copper Limited recruitment पात्रतेचे निकष पदानुसार वेगवेगळे आहेत. सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट (मायनिंग) पदासाठी उमेदवारांनी पदवी किंवा मायनिंग इंजिनियरिंग पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तर एनवायरमेंट विषयातील सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट पदासाठी इंजिनियरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे. इतर पदांसाठीही संबंधित विषयातील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अपेक्षित आहे.
 
 
या नोकरीत उमेदवारांना Hindustan Copper Limited recruitment मासिक निश्चित पगार देण्यात येणार नसून ‘व्हिजिट’च्या आधारावर मानधन दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात सुमारे १६ व्हिजिट असतील आणि प्रत्येक व्हिजिटसाठी ३,५०० ते ६,२५० रुपये मानधन मिळेल. या पद्धतीनुसार महिन्याला सुमारे एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत [www.hindustancopper.com](http://www.hindustancopper.com) या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची संधी, परीक्षा न देता थेट मुलाखतीतून निवड आणि आकर्षक मानधन यामुळे ही भरती तरुणांसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.