इस्लामाबाद,
pakistani-general-viral-video मागील मे महिन्यात भारताकडून मोठा पराभव सहन केल्यानंतर पाकिस्तान इतका हताश झाला आहे की आता पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही असभ्य आणि रस्त्याच्या पातळीवरील भाषेत बोलू लागले आहेत. अलीकडेच पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते आणि इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (डीजी आयएसपीआर) प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीने पत्रकार परिषदेत भारताला थेट धमक्या दिल्या. एवढेच नव्हे तर त्याच्या वक्तव्यात अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली.

या पत्रकार परिषदेत बोलताना अहमद शरीफने दावा केला की भारत कधीही पाकिस्तानचे अस्तित्व मान्य करणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानने कायम सज्ज राहिले पाहिजे. “हिंदुस्थान तुमचे अस्तित्व मान्य करायला तयार नाही. ते ‘शत्रूचा शत्रू मित्र’ अशा भूमिकेतून बोलत आहेत,” असे विधान त्यानी केले. pakistani-general-viral-video यानंतर त्याच्या वक्तव्याचा सूर अधिकच आक्रमक आणि वादग्रस्त झाला. “तुम्हाला जे करायचे आहे ते करून या. उजव्या बाजूने या, डाव्या बाजूने या, वरून या किंवा खालीून या. सगळे एकत्र या किंवा कुणासोबत या; पण एकदा तुम्हाला मजा करून दाखवली नाही, तर पैसे परत,” असे म्हणत त्यांनी उघडपणे धमकी दिली.
सौजन्य : सोशल मीडिया
हेच ते अहमद शरीफ असल्याची आठवण करून दिली जात आहे, ज्यानी यापूर्वी एका भरगच्च पत्रकार परिषदेत महिला पत्रकाराकडे डोळा मारल्याचा प्रकार घडवला होता. त्या घटनेनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर तीव्र टीका झाली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या भाषाशैलीमुळे पाकिस्तान लष्करातील वाढती निराशा आणि अस्वस्थता उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे. एका हवालानुसार, वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी या वक्तव्यांकडे पाकिस्तान लष्करातील खोलवर असलेल्या असुरक्षिततेचे लक्षण म्हणून पाहिले आहे. सूत्रांच्या मते, सध्याचा अधिकृत लष्करी प्रवक्ता अशा प्रकारची रस्त्यावरील भाषा वापरत असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. pakistani-general-viral-video आतापर्यंत डीजी आयएसपीआरच्या पत्रकार परिषदांमध्ये भारताविरोधी ठराविक आणि साचेबद्ध वक्तव्येच ऐकायला मिळायची. मात्र यावेळी त्याचा सूर वेगळा आणि अधिक आक्रमक दिसून आला. औपचारिक लष्करी किंवा कूटनीतिक भाषेऐवजी उपरोधिक आणि टोमणेबाज शब्दांचा वापर आत्मविश्वासाचे नव्हे, तर वाढत्या असुरक्षिततेचेच द्योतक असल्याचे गुप्तचर सूत्रांचे मत आहे.