केसरीनंदन हनुमान मंदिरात नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शिनी उईके यांचा सत्कार

07 Jan 2026 19:33:43
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : यवतमाळच्या गोधनी बायपास येथे असलेल्या केसरीनंदन हनुमान मंदिरात विश्वस्त मंडळाकडून यवतमाळच्या नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शिनी अशोक उईके यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रचारकाळात अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दोनवेळा केसरीनंदन हनुमान मंदिरात येऊन महाआरती व हनुमान चालीसा पठणात सहभाग घेतला होता. सुदृढ आरोग्यासाठी दररोज सकाळी पायी फिरणाèया, धावणाèया व व्यायाम करणाèया नागरिकांनी एक वर्षापूर्वी केसरीनंदन हनुमान मंदिराची स्थापना केली होती. भक्तांच्या सहयोगातून या मंदिराचे झपाट्याने सुशोभीकरण होत आहे.
 

y7Jan-Kesarinandan 
 
प्रत्येक शनिवारी संध्याकाळी येथे आरती व हनुमान चालीसा पठणास भाविकांची मोठी गर्दी असते. स्पर्धा परीक्षेला पुढे जाणारी युवा मंडळी येथे व्यायाम सरावाला येतात. परिसरात वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम विश्वस्तांकडून हातात घेण्यात आले आहे. या परिसराचा विकास व्हावा, शहरातील सर्व देवस्थानांमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिल्या जावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अ‍ॅड. प्रियदर्शिनी उईके यांनी सांगितले.
 
 
यावेळी केसरीनंदन हनुमान मंदिर व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य अमोल ढोणे, अभय वडगिरे, उमेश पांडे, राहुल मिश्रा, रुपेश जयपुरिया, विजय शर्मा, शैलेश मोरे, सागर अजमिरे, अमोल मोरे, अविनाश राठोड, गजू बिल्लावार, गजू लाभसेटवार, अजय नंदुरकर, अतुल मिश्रा, अमजित सरगर, प्रशांत भांडारकर, सचिन बुटले, आनंद वानखडे, अमर दिनकर, गोविंद जाधव, विकी बानोरे, निर्मल ठोंबरे, महेंद्र ठोंबरे, रितेश धामणकर, अभिजित भुमरे, संतोष मिश्रा उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0