लातूर,
amit deshmukh भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानाने लातूरच्या राजकारणात मोठा भूकंप उडविला आहे. या विधानामुळे नागरिकांची भावना दुखावली गेली असून, स्थानिक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आज लातूर बंदची हाक दिली होती. मात्र, विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी संयमी भूमिका घेत या बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जनतेला नाहक त्रास नको असल्याचे सांगितले.
वादाची सुरूवात amit deshmukh लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात झाली. एका जाहीर सभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी असे विधान केले की, “भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील” असा विश्वास वाटतोय. या विधानामुळे लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि केवळ राजकीय विरोध म्हणून नव्हे, तर शहराच्या विकासात मोठे योगदान दिलेल्या नेत्याबद्दल अशा शब्दात बोलल्यामुळे काँग्रेससह अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या.
या पार्श्वभूमीवर, amit deshmukh आज शहरात राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी १ वाजता मेन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभा पार पडणार होती, आणि या सभेच्या दिवशी शहरात तणाव वाढण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत अमित देशमुख यांनी आपले मत मांडून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. “रवींद्र चव्हाण यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे खरं आहे, परंतु भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला आणि व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये. विलासराव साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपण लोकशाही आणि सुसंस्कृत मार्गाने या अपमानाचे उत्तर देऊ,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अमित देशमुखांच्या या संयमी भूमिकेचे राजकीय वर्तुळात कौतुक होत असले तरी, विलासरावांच्या चाहत्यांमधील रोष येत्या निवडणुकीत भाजपला महागात पडू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही या विधानाच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात अधिक ताकदीने उतरण्याचे ठरवले आहे, ज्यामुळे लातूरमधील राजकीय वातावरण आणखी गोंधळलेले राहण्याची शक्यता आहे.