मराठी पत्रकारदिन साजरा

07 Jan 2026 20:31:51
सिंदीरेल्वे,
marathi-journalists-day : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पालिकेच्या नव्या सभागृहात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
 
 
K
 
आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष राणी कलोडे व प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सुरकार यांनी केले. याप्रसंगी पत्रकारिता हे दुधारी शस्त्र असून ते बुमरंग झाल्यास वृत्त प्रतिनिधीचा कपाळमोक्ष होतो. तथापि, पत्रकारांनी समाजोपयोगी कार्यासाठी लेखणी झिजवा, असा हितोपदेश सुरकार यांनी केला. संपलेल्या वर्षांत भारतातील २८४ पत्रकार दिवंगत झाले. तसेच विविध युद्धांचे वार्तांकन करताना जगात ८७२ पत्रकारांचे बळी गेले, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
यावेळी नगराध्यक्ष राणी कलोडे यांचा पत्रकार संघाच्या वतीने नरेंद्र सुरकार यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगराध्यक्षांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली, हे विशेष! तसेच इतर नगरसेवकांचाही शुभेच्छा देण्यात आल्या. सत्काराला उत्तर देतांना नगराध्यक्ष राणी कलोडे यांनी आपण पारदर्शी कारभार करेन, असे आश्वासन दिले. संचालन मोहन सुरकार यांनी केले तर आभार अमोल सोनटक्के यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0