९६ मोबाईल मूळ मालकांना परत

07 Jan 2026 20:52:10
वर्धा, 
mobile-phones-returned : चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने ५ जानेवारी रोजी पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ९६ मोबाईल संबंधित मालकांना सुपूर्द करण्यात आले. या मोबाईल फोनची किंमत ९ लाख ६० हजार रुपये आहे.
 
 
 
K
 
 
 
मोबाईल केवळ संवादाचे साधन न राहता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे मोबाईल हरवणे किंवा चोरीस जाणे आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून हरवलेल्या मोबाईल बाबत सायबर सेल विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे सायबर सेलने तांत्रिक तपास करत तब्बल ९६ मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले. या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांच्या हस्ते मोबाईल फोन वितरित करण्यात आले. मोबाईल शोध मोहिमेत सायबर सेलचे एपीआय आशिष चिलांगे यांच्यासह पोलिस कर्मचारी दिनेश बोथकर, मीना कौरती, विशाल मडावी, अनुप कावले, अक्षय राऊत, अंकित जिभे, स्मिता महाजन यांनी मोलाचे योगदान दिले.
Powered By Sangraha 9.0