जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींमध्ये अभिनेते भारत गणेशपुरे यांचा कार्यक्रम

07 Jan 2026 17:33:07
वाशीम,
Bharat Ganeshpure मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते भारत गणेशपुरे हे भेट देणार आहेत तसेच ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. अभियानाची व्यापक प्रसिद्धी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Bharat Ganeshpure  
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे आणि सर्व विभाग प्रमुख हे सुद्धा या अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पुढाकार घेत आहेत, गावांना भेटी देत आहेत. सर्व तालुयाचे गटविकास अधिकारी या अभियानासाठी गावांना प्रोत्साहित करत आहेत.
जिल्ह्यातील मोरगव्हाण (ता. रिसोड), ढोरखेडा (ता. मालेगाव), सेलू बुद्रुक (ता. वाशीम), पारवा (ता. मंगरूळनाथ), कारखेडा (ता. मानोरा) आणि सुकळी (ता. कारंजा) या ग्रामपंचायतींना भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ८ च्या दरम्यान वरील गावांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांची झूम मीटिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, स्वागत व्यवस्था, ग्रामस्थांची उपस्थिती, प्रचार - प्रसिद्धी, स्वच्छता, सजावट आणि नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आत्माराम बोंद्रे यांनी भारत गणेशपुरे यांच्या भेटीचा सविस्तर कार्यक्रम यावेळी सादर केला. बैठकीस अभियानाचे प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे तसेच पंचायत विभागाच्या वैशाली मिसाळ उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवावे व आपल्या गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्वल करावे.अर्पित चौहाण, मुख्य कार्यकारी अधिकारी
Powered By Sangraha 9.0