नागपूर,
train-cancellation : मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड-मनमाड लोहमार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पुण्यातून नागपूरकडे आणि नागपुरातून पुण्याकडे ये-जा करणार्या रेल्वे गाड्यांसह तसेच नांदेड, लातूर आणि मराठवाड्यासह दक्षिण-उत्तरेकडे जाणार्या रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द आल्या आहेत.

मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वया अभावी विदर्भातून पुण्याकडे ये-जा करणारे प्रवासी नववर्षाच्या सुरुवातीलाच संभ्रमात पडले आहेत. याविषयी कुठलीही प्रेस नोट किंवा माहितीपत्रक प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे नागपूर विभागाला जराशीही माहिती नसून तो अनभिज्ञ असल्याचे सिद्ध झाले आहे.नागपूर ते पुणे दरम्यान रद्द होणार्या गाड्यामध्ये प्रामुख्याने एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, अजनी-पुणे एक्स्प्रेस, पुणे-अजनी हमसफर एक्स्प्रेस, अजनी -पुणे हमसफर एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेसचा समावेश आहे. दुहेरीकरणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग या दुरुस्तीचे काम २५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे.