नागपूर,
flight-delays : उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे मध्यवर्ती विमानतळावरील विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मंगळवारी डझनभर विमानांना विलंब झाल्यानंतर बुधवारी सुध्दा अशीच स्थिती कायम होती. दाट धुक्यामुळे नागपूरात अनेक विमाने उशिरा आली. यात प्रामुख्याने दिल्लीचे विमाने उशिरा आली, यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून धुक्यामुळे विमान वाहतूक सेवेलाही फटका बसत आहे. नागपूर विमानतळावरील प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.
उशिरा येत असलेल्या विमान सेवेत बंगळुरू-नागपूर ,दिल्ली-नागपूर, मुंबई-नागपूर, कोलकाता-नागपूर, इंदूर-नागपूर तसेच नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे आदी मार्गावरील विमानसेवेचा समावेश आहे. एकीकडे कडाक्याची थंडी जाणवत असताना दाट धुक्यामुळे विमानउड्डाणांवर परिणाम झाला आहे. नागपूरहून दिल्लीला जाणार्या आणि तिथून येणार्या विमान उशिरा येत आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू, पुणे, कोलकाता, इंदूर या शहरांचा समावेश आहे.
रेल्वे वाहतूकीवर परिणाम
उत्तर भारत आणि हावडा येथून येणार्या गाड्या बुधवारी सुध्दा उशिरा नागपूर रेल्वे स्थानकावर आल्याने प्रवाशांना प्रतिक्षेत राहावे लागले. ट्रेन १२२८६ सिकंदराबाद दुरांतो १४ तासांच्या विलंबाने पोहोचली. ट्रेन १२२१४ यशवंतपूर एसी दुरांतो ६ तासांनी उशिरा, २०४९४ मदुराई एक्सप्रेस २ १२६१६ जीटी एक्सप्रेस १.४५ तास, २२६९२ सिकंदराबाद राजधानी ३ तास, २०८०६ आंध्र प्रदेश एक्सप्रेस ५ तास, १२६२६ केरळ एक्सप्रेस ७ तास, १२६२२ तमिळनाडू एक्सप्रेस ५ तास, १२७२२ दक्षिण एक्सप्रेस ४ तास, १२४६६ मिलेनियम एक्सप्रेस २ तास, १२६५२ तमिळनाडू संपर्क क्रांती १तास, १२५२१ राप्ती सागर एक्सप्रेस ३ तास, गंगाकवेरी एक्सप्रेस तास, १२८६० गीतांजली एक्सप्रेस २ तास, १८०३० एलटीटी एक्सप्रेस ३ तास, १२८१० मुंबई मेल ३ तास, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस उशिरा रेल्वेस्थानकावर आली.