'या' तारखेला थंडी वाढणार ... नागपूरकरांनो जरा जपून रहा!

07 Jan 2026 15:08:18
नागपूर,
nagpur weather update गेल्या दोन दिवसांपासून शहरात थंडीची लाट उसळली असून नागरिकांची हुडहुडी वाढली आहे. सकाळी आणि रात्री गार वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे टाळावे लागत आहे. फक्त सूर्यप्रकाशामुळेच थोडासा दिलासा मिळतो, पण दिवसाचे तापमानही सातत्याने घसरत असल्याने नागपूरकरांना थंडीत सुटका नाही.
 

nagpur weather update 
मंगळवारी हवामान खात्याने nagpur weather update शहराचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सरासरीपेक्षा सुमारे ५ अंश कमी आहे. थंडीच्या लाटेमुळे २४ तासांत शहराचे तापमान ६ अंशांनी घसरले. सोमवारी शहराचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी शहराचे कमाल तापमान २७.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.हवामान विभागानुसार, १२ जानेवारीपर्यंत शहराचे हवामान असेच राहण्याची शक्यता आहे. या काळात आकाश निरभ्र राहील, किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर कमाल तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
 
 
 
तापमानात झपाट्याने घट nagpur weather update झाल्यामुळे मागील थंडीचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वाढली आहे. २०१६ मध्ये २३ जानेवारी रोजी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस, तर २०१९ मध्ये ४.६ अंश सेल्सिअस आणि २०२० मध्ये ५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.शहरातील नागरिक उबदार कपडे घालून बाहेर पडताना दिसतात, तर पदपथांवर शेकोटी पेटवून हात गरम करताना देखील दिसत आहेत. नागपूरसह पुण्यातही यंदा थंडीने विक्रम मोडला असून, डिसेंबर महिन्यातील गेल्या १० वर्षांतील सर्वात थंड दिवसाची नोंद झाली आहे. डिसेंबरच्या अवघ्या २३ दिवसांत १३ दिवस किमान तापमान एक अंकी असल्याचे नोंदवले गेले आहे.शहरवासीयांनी या थंडीच्या लाटीपासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0