पोरवाल कॉलेजचा स्थापना दिन सोहळा उत्साहात

07 Jan 2026 12:40:02
नागपूर,
Porwal College foundation कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाचा स्थापना दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आज संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामठी नगर परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अजय अग्रवाल राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मनोहर कुंभारे, संचालक वसंत नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत.
 
Porwal College foundation
 
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ, कामठीचे अध्यक्ष संजीव कुमारजी पोरवाल, उपाध्यक्ष अखिल पोरवाल, कोषाध्यक्ष अभिमन्यू पोरवाल, सचिव विजय शर्मा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दाहात यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाची स्थापना शिक्षण प्रसारक मंडळ, कामठी अंतर्गत सन १९६५ मध्ये नेमकुमार पोरवाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केली. Porwal College foundation स्थापनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने महाविद्यालयाचा हिरक जयंती वर्ष म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
 
विद्यापीठांतर्गत ग्रामीण भागातील एक नावाजलेले महाविद्यालय म्हणून पोरवाल कॉलेजची ओळख आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे शिक्षण घेत असून, गुणवत्तात्मक व संख्यात्मक दोन्ही दृष्टीने महाविद्यालयाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. Porwal College foundation शिक्षण क्षेत्रात सातत्याने वाटचाल करत हे महाविद्यालय उज्ज्वल भविष्याकडे पुढे जात आहे.
सौजन्य: डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0