वर्धा,
newly-appointed-vice-president : जिल्ह्यातील सहा नगर पालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. २१ रोजी मत मोजणी झाली. त्यात वर्धा, देवळी व पुलगाव सोडून हिंगणघाट, आर्वी आणि सिंदी रेल्वे येथे भाजपाचा नगराध्यक्ष झाला. त्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. १३ ते १६ जानेवारी दरम्यान सहाही नगर पालिकांमध्ये उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांकरिता बैठक होणार आहे. दरम्यान, नप निवडणुकीत राग लोभ लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने काही नियम तयार केले असल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला वर्धा आणि देवळी येथे सर्वात जास्त नाराजीला पुढे जावे लागले होते. आर्वी येथे काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत. वर्धेतही सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार नव्हते. असे असताना वर्धा व पुलगाव येथे काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर देवळी येथे अपक्ष नगराध्यक्ष निवडून आला. निकाल लागताच स्वीकृत सदस्यांकरिता फिल्डींग लावणे सुरू केले. वर्धेत तीन स्वीकृत सदस्य नियुत करता येईल असे बहुमत मिळाले आहे. ४० नगरसेवकांमध्ये २५ भाजपाकडे, काँग्रेसकडे ५, शरद पवार गटाकडे ५, राकाँकडे २ आणि मापकाचा एक तर दोन अपक्ष सदस्य आहेत.
वर्धा नगर पालिकेत उपाध्यक्ष व चार स्वीकृत सदस्यांकरिता १६ रोजी बैठक बोलवण्यात आले आली आहे. यासोबतच हिंगणघाट, सिंदी रेल्वे आणि पुलगाव येथे १३ रोजी निवड प्रक्रीया पार पाडण्यात येणार आहे. भाजपाकडे स्वीकृत सदस्यपद मागणार्यांची संख्या लक्षात घेता काही नियम लावण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. या नियमांच्या आधारातून पक्षनिष्ठा आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याच्या स्पष्ट सुचनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. साधारणत: वर्धा नगर पालिका निवडणुकीतच भाजपात निष्ठावान, जुना नवा कार्यकर्ता विषय चर्चेत आला होता. त्यामुळेच भाजपा श्रेष्ठींनी हा निर्णय तर घेतला नाही ना अशी चर्चा आहे.