शिवकालीन वारसा बावनबुरजी बचाव कृती समितीचा पुढाकार

07 Jan 2026 20:59:37
बुलडाणा, 
bavanburji-protection-action-committee : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंदखेड राजाला राजांचे आजोळ तर ५२ बुरजी अर्थात करवंडला त्यांची सासरवाडी. छत्रपती घराण्यात दोन मुली देणार्‍या करवंड गावचा इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला.हा ऐतिहासिक ठेवा पुढे आणून शिवकालीन वारसा जतन करण्यात यावा यासाठी ५२ बुरजी बचाव कृती समितीने पुढाकार घेत जिजाऊ महोत्सवाप्रमाणे करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले आहे.
 
 
J
 
 
 
यासाठी महत्त्वपूर्ण बैठक ४ जानेवारी रोजी करवंड गढी परिसरात पार पडली.आठ जिल्ह्यातील शिवप्रेमी यावेळी उपस्थित राहिले. हा मुद्दा प्रकाशझोतात आल्यानंतर ह्याच दिवसाचे औचित्य साधून बावनबर्जी बचाव कृती समितीच्या वतीने दि. १५ एप्रिल २०२६ रोजी करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरले. यासाठी बैठकीचे आयोजन दि. ४ जानेवारी रोजी करवंड येथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जिजाऊ जन्मोत्सवाच्या धर्तीवर करवंड महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करून छञपती शिवाजी महाराज व गुणवंताराणीसाहेब यांच्या विवाह सोहळ्याची अनुभूती महोत्सवाच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा करून देण्याचा निर्धार केला.
 
 
याप्रसंगी हरिरूद्रप्रसाद इंगळे, अरविंद देशमुख, सुनिल जवंजाळ,प्राचार्य अन्नासाहेब म्हळसने, गणेशराजे जाधव,प्रा.नाईकवाडे , अ‍ॅड. विजय सावळे, पञकार राजेंद्र काळे, गणेश निकम, संदीप वानखेडे, युवराज वाघ,सोहम घाडगे,पप्पू राऊत, विनोद सावळे, विजय घ्याळ ,श्याम देशमुख इतिहास संशोधक रामेश्वर शेडगे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती मोहनराव जाधव, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, यांचेसह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय घ्याळ यांनी केले तर आभार श्याम देशमुख यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0