हिंगणघाट,
bhupendra-shahane : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांच्या अध्ययन सदस्यपदी येथील पिवी टेसटाईल्सचे महाप्रबंधक भूपेंद्र शहाणे यांची नियुती करण्यात आली. ही नियुती राज्यपालांच्या मान्यतेने दोन वर्षांकरिता करण्यात आली.
भूपेंद्र शहाणे यांनी विद्यार्थी काळापासून अभाविच्या विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत. अभाविपचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या अखिल भारतीय जन्मशताब्दी सोहळ्याचे संयोजक म्हणून त्यांनी काम केले आहे. पी.व्ही. टेसटाइल्स जाम येथे महाप्रबंधक पदावर ते मागील ३० वर्षापासून कार्यरत असून उद्योग, प्रशिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या अध्यासनाचा उद्देश कुशल व समृद्ध समाज व राष्ट्रनिर्मिती आवश्यक कौशल्यविकासावर आधारित थोर व्यतित्त्वाच्या विचारांचे व संकलन व अभ्यास करणे, प्राचीन परंपरा व स्थानिक कौशल्याचा आढावा घेऊन त्यांना आधुनिक गरजा व परिस्थितीनुसार पुनर्रचित करणे, इत्यादी विविध काम या अध्यासनाकडे असून कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाशी सुसंगत अभ्यासक्रम, संशोधन व नवोपक्रम यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार असून यांचा फायदा कौशल्यावर आधारित शिक्षण घेणार्यांना होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.