अबब... 6 मिनिटांचा डान्स आणि कोट्यवधींची फी!

तमन्ना भाटियाची मानधन रक्कम ऐकून बसेल धक्का

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
गोवा,
tamanna bhatia दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपली खास छाप सोडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया, तिच्या आयटम साँगमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित एका भव्य कार्यक्रमात तिने सादर केलेल्या सहा मिनिटांच्या नृत्य प्रदर्शनासाठी तिने तब्बल ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समजत आहे.
 

tamanna bhatia-6-crore-dance-fee-goa-new-year-performance 
या कार्यक्रमात तमन्नाने आपल्या लोकप्रिय ‘आज की रात’ या गाण्यावर दमदार डान्स सादर केला. तिच्या ऊर्जा, कमालीच्या स्क्रीन प्रेझेंस आणि स्टेजवरील आकर्षक परफॉर्मन्समुळे या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. तमन्ना भाटियाने आपल्या एका मिनिटाच्या डान्ससाठी एक कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मिळालेली एकूण रक्कम ६ कोटी रुपये झाली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया आयटम साँगसाठी ओळखली जाते आणि ‘जेलर’मधील ‘कावाला’, ‘स्त्री २’मधील ‘आज की रात’, तसेच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील ‘गाफूर’ यांसारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. या कारणामुळे तिला ‘आयटम साँग क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
 
 
गोव्यातील tamanna bhatia लास ओलास बीच क्लब, बागा येथे ३१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात तमन्नाने पंजाबी स्टार सोनम बाजवासोबत स्टेज शेअर केला. तिच्या सोबतच गायक मिलिंद गाबानेही उपस्थितांना मनोरंजन दिले.तामन्नाच्या या मानधनाची रक्कम सध्या चर्चेत आहे, कारण ती साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या आगामी ‘जन नायकन’ चित्रपटातील भूमिकेसाठी बॉबी देओलला मिळालेल्या मानधनापेक्षा जास्त आहे. या चित्रपटासाठी बॉबी देओलला तीन कोटी रुपये फी मिळाल्याचे समजते. तमन्नाच्या टीमकडून अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.सोशल मीडियावर चाहत्यांनी तमन्नाच्या ऊर्जा आणि कमालीच्या नृत्य कौशल्याचे कौतुक केले असून, तिच्या परफॉर्मन्समुळे गोव्यातील न्यू इअर पार्टी अधिक उत्साही आणि रंगीबेरंगी ठरली आहे.