मुंबई/चेन्नई
thalapathy vijay दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणात सक्रिय असलेले थलापती विजय सध्या त्यांच्या आगामी आणि शेवटच्या ठरणाऱ्या “जन नायकन” चित्रपटामुळे चर्चेत असतानाच, करूर चेंगराचेंगरी प्रकरणामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तामिळनाडूतील करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) विजय यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असून १२ जानेवारी रोजी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण 27 thalapathy vijay सप्टेंबर 2025 रोजी घडले होते. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळागा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाच्या जाहीर सभेदरम्यान करूर येथे अचानक चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असून मीडिया रिपोर्ट्सनुसार किमान 41 जणांचा मृत्यू झाला, तर 110 हून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि प्रशासनाच्या तसेच आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
चेंगराचेंगरीनंतर दुसऱ्याच thalapathy vijay दिवशी थलापती विजय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची माफी मागितली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिले होते की, “करूरमध्ये जे घडले ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. त्याबद्दल विचार करताना माझे हृदय आणि मन अस्वस्थ झाले आहे. माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” तसेच, उपचार घेत असलेल्या सर्वांना पक्षाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले होते.
मात्र, या घटनेनंतर अनेक सामाजिक आणि राजकीय स्तरावरून विजय यांच्यावर टीकेची झोड उठली होती. सभेच्या आयोजनातील त्रुटी, गर्दी नियंत्रणातील अपयश आणि सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबाबत त्यांना जबाबदार धरले जात होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची गंभीर दखल घेत सीबीआयने तपास सुरू केला असून आता थेट विजय यांची चौकशी होणार आहे.दरम्यान, विजय यांचा “जन नायकन” हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार असल्याचे आधीच जाहीर झाले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा कायदेशीर तपास आणि सीबीआय चौकशीमुळे विजय यांच्या कारकीर्दीतील हा टप्पा अधिकच चर्चेत आला आहे. 12 जानेवारीच्या चौकशीनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.