राजकारणाचा भूलभुलैया...

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
 
वेध
labyrinth of politics अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ज्यात प्रवेश मिळतो, ते क्षेत्र म्हणजे राजकारण! मगं तुमची खरी कसोटी लागते! प्रवेश सोपा असला तरी, मगं इच्छा असूनही त्यातून बाहेर पडणे कठीण होते. राजकारणाचा हा आधुनिक भूलभुलैया आठवण करुन देतो, तो लखनऊच्या बडा इमामवाडा या ऐतिहासिक वास्तूतील भूलभुलैयाची! आजची राजकारणाची अवस्थाही याच भूलभुलैया सारखीच झालीय, हे तर मान्यच करावे लागेल! तुमच्या पैकी बहुतांशांनी लखनऊच्या भूलभुलैया या वास्तूला भेट देत वास्तूकलेच्या चमत्काराचा अनुभव नक्कीच घेतला असेल! काय आहे हा भूलभुलैया...तर नवाब आसफउद्यौला याने 1975 साली बांधलेली ही वास्तू. बडा इमामवाडा या ऐतिहासिक वास्तूचा एक भाग, म्हणजेच जाळीदार प्रवेशद्वार! अनेक गुप्त मार्ग, अनेक दरवाजे, कान असलेल्या भिंती, आवाज आणि प्रतिध्वनींचा खेळ असे सर्व काही या वास्तूत अनुभवास मिळते. कुठला मार्ग कूठे जाणार आणि कुठून बाहेर पडणार, याचा जराही अंदाज लावला जाऊ शकत नाही. येथे प्रवेशाचा मार्ग तर दिसतो, पण परतीचा मार्गच सहजासहजी सापडत नाही! हा सगळा जो गोंधळ आहे, तो म्हणजे भूलभुलैया! आता या भूलभुलैयाचा आणि राजकारणाचा काय संबंध? असा विचार नक्कीच तुम्हाला पडला असेल, पण सध्या जी राजकारणाची अवस्था झाली आहे, ती अशीच काहीशी आहे.
 
 

राजकारण  
 
 
आजचे राजकारण लखनऊच्या भूलभुलैया पेक्षाही एक पाऊल पूढे आहे. किमान तेथे बाहेर काढण्यासाठी कूशल ‘मार्गदर्शक’ सोबत असतो, येथे तर सोबत असलेलाच आणखी गोंधळात कसे टाकता येईल, याच्या नियोजनात व्यस्त असतो. जसे भूलभुलैयात कुठला मार्ग कूठे जातो, हे ओळखणे कठीण आहे, तसेच राजकारणातही विचारधारा ओळखणे अवघड होऊन बसले आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा हे शब्द राजकारणाच्या शब्दाकोषात असावेत, की नाही यावर नक्कीच चर्चा होऊ शकते. एक काळ होता, जेथे पक्षासाठी सर्वस्व त्यातून झटणारे कार्यकर्ते होते. आता तिकिट मिळव म्हणून पक्ष त्यातून विचारधारेचा खेळ करणारेच सापडतात. वर्षानूवर्ष सोबत काम करणारा कार्यकर्ताही क्षणात विचाराधारा बदलून दूसरीकडे उडी घेतो, तेव्हा न गवसणाऱ्या भूलभुलैयातील रस्त्यांची आठवण होते.
राजकारणात अनेक मोठमोठाली स्वप्ने घेऊन लोक येतात. प्रत्येकाचं ध्येय हे सत्ता, पद हेच असतं. अपेक्षा पूर्ण न झाल्यास एका पक्षातून दूसरीकडे उडी मारुन इच्छापूर्तीचा प्रयत्न केला जाता, मात्र राजकारणाच्या या भूलभुलैयातून अशांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, हे नक्की! भूलभुलैयात जसे भिंतीला कान असतात, असे म्हणतात. जराही पूटपूटलो तरी दूसèया टोकावर ऐकायला जातं, तसेच राजकारणातही तुम्ही कुठल्याही पक्षात का असेनात तुम्ही काय आणि कुणाबद्दल बोलता याची इतंभूत माहित दूसरीकडे पोहविणारे कान राजकारणात आहे. नाहीतर घराच्या बेडरुम मध्ये बसून असलेल्या नेत्यांचे व्हिडीओ, महत्वाच्या विषयांवरील चर्चा बाहेर जाऊन दूसऱ्यांना राजकारण करण्याची संधी मिळालीच नसती ना?
अनेक मार्गाने, विविध दरवाजांमधून फिरुन शेवटी एकाच ठिकाणी पर्यटकांना आणून ठेवणारी वास्तू म्हणजे भूलभुलैया! राजकारणही तसेच...विकासाच्या नावाने सत्तेच्या केंद्रास्थानापर्यंत पोहचण्याचा हा चांगला मार्ग आहे.labyrinth of politics दोन भाऊ, त्यांचे दोन राजकीय पक्ष एक आल्याचा आनंद साजरा करीत नाचणारे आनंदोत्सवाच्या 12 तासानंतर विकासाची ‘री’ ओढीत सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत असतील तर ही जादू सुद्धा भूलभुलैयाचीच म्हणावी लागेल.
आज एका पक्षासोबत असला तरी खरचं तो त्याचा आहे का? याची खातरजमा करण्याची वेळ आली आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा या गोष्टी इतिहासजमा होत, राजकारणात नेत्यांची वाहवा, त्यांच्या मागेपूढे फिरणे आणि आर्थिक कसोट्यांवर मिळणारे गूण अशा निकषांचे महत्व वाढले आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यात आज जे चित्र आहे, ते राजकारणाच्या आधुनिक भूलभुलैयाचे आहे. एकीकडे प्रचंड ओढा आणि दूसरीकडे चोळामोळा अशी अवस्था नगर पालिका, महानगर पालिकांच्या निवडणूकांच्या निमित्ताने दिसून आली. हे का? तर राजकारणाचा झालेल्या भूलभुलैयामुळे! या राजकीय भूलभुलैयात नेते मंडळी इच्छीतस्थळी पोहचतीलही पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय? त्यांना यातून बाहेर काढणारा ‘गाईड’ त्यांच्या पाठिशी आहे का? याचा विचार त्यांनीच करावा! कारण लखनऊचा भूलभुलैया तर केवळ मनोरंजन आहे, पण राजकीय भुलभूलया आयुष्याच्या चांगल्या, वाईटाची दिशा स्पष्ट करणारा आहे.
विजय निचकवडे
मो. 9763713417
...