शरीरातील साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
remove toxins आधुनिक जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडणे सामान्य झाले आहे. यामुळे आतड्यांमध्ये घाण साचते आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी खालील फळांचे नियमित सेवन करा

फ्रुट  
 
सफरचंद
सफरचंदांमध्ये विरघळणारे फायबर (पेक्टिन) असते, जे आतड्यांमधील घाण सहज बाहेर काढते. यासोबत रक्तातील वाढलेला खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते.
पपई
पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रिया सुधारते. सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
किवी
किवीमध्ये फायबर आणि विटामिन C मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्वचेवर चमकदार ग्लो येतो.
पेरू
पेरूमध्ये फायबर आणि विटामिन C असल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. सकाळी उठल्यावर पेरू खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते. पेरूच्या पानांचे सेवन देखील शरीराला भरपूर फायदे देते.
डाळिंब
डाळिंबाचा रस रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.remove toxins तसेच, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाचे दाणे खाल्ले पाहिजेत.
दैनंदिन आहारात ह्या फळांचा समावेश केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडते, पचन सुधारते आणि शरीर निरोगी राहते.