वणी,
ulhas-nimekar : वणी महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उल्हास निमेकर यांची निवासी नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक कार्यशैली आणि जनतेशी सलोख्याचे संबंध ही त्यांची ओळख असून, त्यांनी आपल्या सेवाकाळात महसूल विभागातील विविध जबाबदाèया प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. निवासी नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासनातील कौशल्याचा महसूल विभागाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वात महसूल प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनेल, अशी अपेक्षा नागरिक तसेच सहकारी अधिकाèयांकडून व्यक्त होत आहे.