वसंतनगरमध्ये पाच दिवसीय कीर्तन महोत्सव

07 Jan 2026 12:55:28
नागपूर,
Vidarbha Hari Kirtan Sanstha नागपूरस्थ वैदर्भीय हरि कीर्तन संस्था ही शहरात कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे उपक्रम सातत्याने राबवित आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्री संकटमोचन हनुमान मंदिर, वसंतनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत कीर्तनमालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
gajar
 
 
 
ही कीर्तनमालिका दररोज सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत श्री संकटमोचन हनुमान मंदिर, वसंतनगर येथे संपन्न होणार आहे. या उपक्रमांत विविध नामवंत कीर्तनकार आपली कीर्तनसेवा सादर करणार असून Vidarbha Hari Kirtan Sanstha त्यांचा कार्यक्रम असा आहे—दि. ७ जानेवारी : ह.भ.प. श्री संजयबुवा करताळकर,दि. ८ जानेवारी : सौ. नेहा इंदुरकर ,दि. ९ जानेवारी : सौ. मृण्मयी कुळकर्णी, दि. १० जानेवारी श्री मुकुंदबुवा देवरस दि. ११ जानेवारी : श्री शामबुवा धुमकेकर. या कीर्तन मालिकेचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैदर्भीय हरि कीर्तन संस्था व श्री संकटमोचन हनुमान मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सौजन्य:प्रशांत मनभेकर,संपर्क मित्र
 
 
Powered By Sangraha 9.0