तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ashok-uike : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. ते शैक्षणिक सत्र 2025-2026 करिता खेळ व कला संवर्धक मंडळ जिल्हा परिषद यवतमाळद्वारा आयोजित विद्यार्थ्यांचे तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत बोलत होते.
सामाजिक बांंधिलकी म्हणून सदैव विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देणाèया जिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेने राळेगाव तालुका अंतर्गत होत असलेल्या तालुकास्तर क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधून आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील 16 ही तालुक्यांना असणाèया चॅम्पियन चषक व समूह खेळाच्या चषकांचे विमोचन केले.
यावेळी डॉ. अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तालुक्यातील शिक्षकांचे कौतुक केले. सोबतच यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने केलेल्या सामाजिक दायित्वाचेचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, उपाध्यक्ष संजय गावंडे, सचिव संजय बिहाडे व सर्व संचालक उपस्थित होते.