बीटी कापूस पुनर्प्रमाणीकरण

07 Jan 2026 19:23:47
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
bt-cotton-recertification: संकरित बीटी कापसाच्या पुनर्प्रमाणीकरण केलेल्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी शेतकरी संघटनेने कृषी आयुक्तांकडे केली आहे. संकरित बीटी कापूस बियाणे उत्पादक शेतकèयांची फसवणूक करीत असल्याचे केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या बियाणे उपायुक्तांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. खासदार संजय देशमुख यांना 3 नोव्हेंबर 2025 रोजी पाठवलेल्या पत्रात ही बाब उघड झाली आहे.
 
 

y7Jan-Biyane 
 
 
 
बीटी कापूस बियाणे उत्पादक बियाण्यांच्या चाचणीची तारीख आणि गुणवत्तेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव कुठेही नमूद करत नाहीत, याकडे शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी अध्यक्ष मिलिंद दामले यांनी लक्ष वेधले आहे. बियाणे उत्पादकांच्या फसवणूक पद्धती पुढीलप्रमाणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कृषी केंद्र संकरित बीटी कापूस बियाणे उत्पादकांना विकल्या न गेलेले बियाणे परत करतात.
 
नंतर तेच जुने बियाणे नवीन वर्षाची पॅकिंग तारीख टाकून विकतात. बियाणे उत्पादकांचे सत्यप्रत लेबल शेतकèयांची फसवणूक सहज करते. हे उत्पादक पुनर्प्रमाणीकरण म्हणजे नेमके काय करतात हे समजत नाही, असेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे. तसेच संकरित बीटी कापूस बियाणे पाकिटावर बियाणे उत्पादनाचे वर्ष नमूद केले जात नाही. हे उत्पादक नवीन व परत आलेल्या बियाण्यांची भेसळ करून करतात, असेही दामले यांनी म्हटले आहे.
 
 
त्यामुळेच एकाच पाकिटातील एकाच ओळीतील कापसाच्या झाडांची वाढ, उंची, पात्या, फुले व बोंडांची संख्या ह्यात प्रचंड तफावत दिसते. तसेच या झाडांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव यातही तफावत असते.
 
 
तसेच जुन्या बियाण्यांची उगवण व अनुवांशिक शुद्धता अपेक्षेनुसार असली तरी जोम कमी होतो. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती आणि उत्पादकताही कमीच मिळते, याकडेही शेतकरी संघटनेच्या विज्ञान व तंत्रज्ञान आघाडीने लक्ष वेधले आहे.
Powered By Sangraha 9.0