दिग्रसला करोडोंची फसवणूक

07 Jan 2026 19:27:53
अभय इंगळे
दिग्रस, 
fraud-in-digras : येथील जनसंघर्ष अर्बन ‘निधी’कडून लुटण्याचा प्रकाराला एक वर्षही उलटले नसताना आता याहीपेक्षा मोठ्या रकमेने गंडवल्याचा प्रताप मंगळवार, 6 जानेवारीला उघडकीस आला. फसगत करणारा त्या भामट्याने स्वतःच अटक करुन घेतल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. गिरीष किसन दुधे असे त्या भामट्याचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दिग्रस पंचायत समिती अंतर्गत इसापूर केंद्राचा केंद्रप्रमुख गिरीष किसन दुधे कार्यरत आहे. तो वर्धा येथील एका ‘ग्रो कॅपिटल’ कंपनीशी जुळला, या कंपनीत गुंतवलेल्या रकमेची काही महिन्यात दामदुप्पट होते, अस सांगण्यात आले. गिरीषच्या भुलथापांना एक दोन नव्हे तर शेकडो दिग्रसकर गळाला लागले.
 
 

y7Jan-Girish-Dudhe 
 
 
 
अल्पावधीत अधिक श्रीमंत होण्याची लालसेने लाख, दोन लाख गोळा करता करता, रक्कम कोटींच्या घरात गेली. सुरवातीला अगदी वेळेवर परतावा मिळत गेल्याने हा प्रकार कोणाचपासून लपून राहिला नाही. त्यामुळे अनेकजणांनी यात सहभाग घेऊन आपली सुखरुप असलेली रक्कम गिरीष दुधेला सुपूर्द केली. 100 कोटी पेक्षा जास्त रक्कम गोळा करणारा गिरीष मधल्या काळात परिवारासह चक्क देश सोडूनच पसार झाल्याने अनेकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र आता आपण तक्रार देवून मूर्ख ठरणार, या भीतीपोटी सर्वच्या सर्वच गप्प राहीले. लोकांच्या पैशांवर गिरीष विदेशात ऐश करीत होता. मात्र गिरीषने अचानक स्वतःला पोलिस ठाण्यात अटक करुन घेतली. त्याने करोडो रुपयांची कशी वाट लावली, याच्या तपासाचा मोठा पेच आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
 
 
रुषाली गुडपल्लीवार या महिलेने 1 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार 6 एप्रिल 2025 रोजी केली होती. गिरीष दुधे, विनोद दुधे या भावासह विनोदची पत्नी अपर्णा दुधे, मनोज पाटील व पुष्पांजली रंधेरिया या पाचजणांवर कारवाईची मागणी यात केली होती. मात्र हे सारे फरार होते. अचानक गिरीषने स्वतःला अटक करून घेतल्याने रुषालीच्या तक्रारीत नमूद सर्वांवर फसवणूकींतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार वैद्यनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
शहरातील असे ते किती लोक आहेत, ज्यांनी ग्रो कॅपिटल कंपनीत आपली रक्कम गुंतवली, हे जरी आता सांगता येत नसले तरी जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांचा यात सहभाग असून प्रणित मोरेपेक्षा चौपट रकमेची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
Powered By Sangraha 9.0