पेन्शन खाते संलग्न अपघात विम्यातून १० लाखांची मदत

08 Jan 2026 18:01:03
कारंजा लाड

Bank of India pension account, येथील बँक ऑफ इंडिया, शाखेमार्फत पेन्शन खात्याशी संलग्न शून्य प्रीमियम अपघात विमा योजनेअंतर्गत स्व. उद्धव पाचाडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसदारास १० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यात आली.
 

Bank of India pension account, 
स्व. उद्धव पाचाडे हे बँक ऑफ इंडियाचे नियमित पेन्शन खातेधारक होते. त्यांच्या खात्यासोबत कोणताही प्रीमियम न भरता (झिरो प्रीमियम) अपघात विमा संरक्षण उपलब्ध होते. दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे वारसदार स्वप्नील पाचाडे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर बँकेने विमा दावा प्रक्रिया पूर्ण करून १० लाख रुपयांची रक्कम मंजूर केली. कारंजा येथील शाखेत आयोजित कार्यक्रमात शाखा व्यवस्थापक मयूर वायकर व प्राजित वानखडे यांच्या हस्ते स्वप्नील पाचाडे यांना विमा रक्कम धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बँक अधिकारी महेश जाने तसेच कर्मचारी विवेक निशाणराव, रविंद्र वाठोरे आणि संजय वाडेवाले उपस्थित होते. या विमा मदतीमुळे दुःखाच्या काळात कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी बँक व्यवस्थापनाने पेन्शनधारक व खातेधारकांनी बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विमा व विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
Powered By Sangraha 9.0