उद्यापासुन हिंगणघाट येथे नाणे प्रदर्शनी

08 Jan 2026 19:46:11
हिंगणघाट, 
hinganghat-coin-exhibition : स्थानिक निसर्गसाथी फाउंडेशन व ऐतिहासिक ग्रुप यांच्या संयुत वतीने ९ व १० रोजी नाणे प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
 

coin 
 
प्रदर्शनी जी. बी. एम. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुली राहणार आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन ९ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व पोलिस निरीक्षक अनिल राऊत तर अ‍ॅड. सुधीर कोठारी, उमेश तुळसकर, राजेंद्र डागा, सूरज ढोमणे, मुरली मनोहर व्यास, सुनील फुटाणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 
 
नाणे प्रदर्शनात राहुल वाकरे, नितीन भोगल, आनंद वांदिले, वासुदेव पेडवे व पंचशील थूल हे नाणे संग्राहक आपली नाणी प्रदर्शनीत ठेवणार आहेत. सादिक पटेल ऐतिहासिक वंडरफुल राईस प्रदर्शनीत ठेवणार आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे हिंगणघाटची ऐतिहासिक तोफ, हिंगणघाटच्या टाकसाळीत तयार झालेली दोन पैशांची नाणी, तसेच स्व. रहमान पटेल यांना ब्रिटिशांनी १०० वर्षापूर्वी तांदळाचा एक दाण्यावर लिहून दिलेला ११२ अक्षराचा शुभेच्छा संदेश वंडरफुल राईस दाणा हे दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू पाहण्याची संधी आहे.
Powered By Sangraha 9.0