यंदा होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण...धार्मिक नियम पाळणे आवश्यक

08 Jan 2026 15:01:41
Lunar eclipse on Holi day भारतामध्ये होळीच्या सणापूर्वी एक महत्त्वाचा खगोलीय योगायोग घडणार आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे. या दिवशी होलिका दहनाचे धार्मिक कार्य पार पडते, त्यामुळे ग्रहणाच्या काळात पूजा आणि इतर धार्मिक कार्य करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला शास्त्रांनुसार दिला जातो. हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणाचा काळ दुपारी ३.२० वाजल्या पासून सायंकाळी ६.४७ वाजेपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. याचा सूतक काळ भारतात मानला जात आहे. ग्रहण लागण्याच्या ९ तास आधी याचा सूतक काळ लागतो.
 

Lunar eclipse on Holi day 
सुतक काळ
सामान्य सुतक: सकाळी ९:३९ ते संध्याकाळी ६:४६
मुलं, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी: दुपारी ३:२८ ते संध्याकाळी ६:४६
सुतकाच्या काळात मंदिर प्रवेश, पूजा आणि शुभ कार्य करण्यास मनाई
ग्रहणाचे राशी आणि नक्षत्र
हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात होईल. शास्त्रांनुसार, या राशी आणि नक्षत्राशी संबंधित लोकांनी ग्रहणादरम्यान बोलण्यात आणि वागण्यात संयम राखणे, मानसिक संतुलन जपणे आणि अनावश्यक निर्णय टाळणे आवश्यक आहे.
धार्मिक श्रद्धा आणि खबरदारी
ग्रहणाच्या काळात मंत्र जप, ध्यान करणे आणि ध्यानपूर्वक वागणे शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करणे लाभदायी ठरते. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. होळी सारख्या मोठ्या सणाला होणारे हे ग्रहण श्रद्धा आणि सावधगिरीची परीक्षा आहे. शास्त्रीय नियमांचे पालन केल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करता येते.
Powered By Sangraha 9.0