समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

08 Jan 2026 18:51:54
वर्धा,
Samruddhi Mahamarg हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग ९ ते १३ जानेवारी दरम्यान काही ठिकाणी ४५ ते ६० मिनीटांसाठी पुर्णतः थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन प्रवास करणार्‍या जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Samruddhi Mahamarg  
समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुयात गॅन्ट्री उभारण्याचे काम १० टप्प्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. शुक्रवार ९ रोजी चांदुर रेल्वे तालुयातील मांजरखेड व धोत्रा गावाजवळ दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहील. मांजरखेड जवळ नागपूर वाहिनीवर देखील दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहील. १० रोजी धामणगाव तालुयातील वाढोणा गावाजवळ नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४, चांदूर रेल्वे तालुयातील खंबाळा गावाजवळ मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजतादरम्यान ब्लॅाक राहील. १२ रोजी नांदगाव खंडेश्वर तालुयातील शहापूर खेकडी व पाचोड गावांजवळ नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजतादरम्यान ब्लॅाक राहील. दि.१३ जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुयातील देऊळगाव व शहापूर खेकडी या गावांजवळ मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता तर देऊळगाव जवळ नागपूर वाहिनीवर देखील दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान ब्लॅाक राहणार आहे. या दरम्यान मार्ग वाहतुकीकरिता पुर्णतः थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0