स्थायी रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करा : विकास मीना

08 Jan 2026 20:22:34
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
vikas-meena : आदिवासी बांधवांसाठी स्थायी रोजगार व उपजिविकेच्या अनुषंगाने मध आणि इतर विविध उत्पादनांच्या निर्मितीसह बाजारपेठ व विपणनाचे जाळे निर्माण व्हावे. यासाठी सर्वंकष प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. जिल्हाधिकाèयांनी यवतमाळ, पांढरकवडा व केळापूर तालुक्यांचा दौरा करून विविध आदिवासी विकास व प्रशासकीय उपक्रमांची पाहणी व आढावा घेताना ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
y8Jan-Collector
 
 
 
विकास मीना यांनी दौèयादरम्यान सर्वप्रथम यवतमाळ तालुक्यातील चिंचघाट येथील आश्रमशाळेला भेट दिली. आश्रमशाळेत धनुर्विद्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमित रंजन, मुख्याध्यापक संजय शिरभाते उपस्थित होते. धनुर्विद्या क्रीडा प्रकार प्राचीन काळापासून येथील संस्कृतीशी निगडित आहे. स्थानिक प्रशिक्षणाचा उपयोग करून या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त केल्यास राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होऊ शकतात, असे विकास मीना यांनी सांगितले.
 
 
 
मोरगाव (मोरवा) येथे सामूहिक वनहक्क व्यवस्थापन गोदाम व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम विकास मीना यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, तहसीलदार राजेंद्र इंगळे, सरपंच विनोद सुरपाम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या केंद्रासाठी स्व. श्रीमती प्रमिलाबाई देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 9 हजार 700 चौरस फूट जागा दान देण्यात आली आहे.
 
 
 
अंधारवाडी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होत असून तेथील मध उत्पादन, साठवणूक व विपणनविषयक सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा विकास मीना यांनी घेतला. सुमारे 5 लाख रुपयांचे उत्पन्न निर्माण करणाèया या उपक्रमाबाबत जिल्हाधिकाèयांनी समाधान व्यक्त करत मधाच्या मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारावर भर देण्याच्या सूचना दिल्या.
 
 
सुन्ना येथे आदिवासी महोत्सव घेण्याचे नियोजन आहे. त्या पृष्ठभूमीवर प्रस्तावित जागेची पाहणी जिल्हाधिकाèयांनी केली. महोत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक सुविधा, नियोजन व सुरक्षिततेबाबत संबंधित अधिकाèयांना आवश्यक निर्देश दिले.
 
 
पांढरकवडा येथे प्रकल्प कार्यालयात जिल्हाधिकाèयांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे वितरण करण्यात आले. पर्यटन विकास, बांधकाम व पायाभूत सुविधांची विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
 
 
पर्यटन विकास, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे, सीएसआर अंमलबजावणीची सद्य:स्थिती तसेच प्रस्तावित नवीन इमारतींच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0