मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात टणका गाव उतरले मैदानात

08 Jan 2026 17:55:58
वाशीम,
Samruddha Panchayat Raj Abhiyan मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी वाशीम तालुयातील टणका या गावाला भेट दिली. त्यांनी गावातील विविध विकास कामांची पाहणी केली आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत करावयाच्या तयारीबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
 

Samruddha Panchayat Raj Abhiyan 
यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी दिपकसिंग साळुंके, विस्तार अधिकारी विनायक बोरचाटे आणि सरपंच शरद गोदारा आदिंची उपस्थिती होती.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांनी गावातील कामांची पाहणी केली. गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, भूमिगत गटार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेमधून घेण्यात आलेली सिंचन विहीर, सामाजिक सभागृह आदींची पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये रक्तदान शिबिरात भाग घेणार्‍या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत च्या वेबसाईटचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना किरण कोळी म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये टनका या ग्रामपंचायतीने पूर्ण तयारीनिशी उतरून विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार मिळवावा. यासाठी आणखी तयारी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन तोंडगाव ग्राम पंचायत अधिकारी ज्ञानेश्वर भांडारकर यांनी तर गणेश इढोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रेमचंद सिरसाठ, मुख्याध्यापक रविंद्र वानखेडे, शिक्षक बापुराव भुसारे, ग्राम पंचायत सदस्य अर्चना मोरे, बंडु जाधव यांनी परिश्रम घेतले.
गावातील महिलांनी उमेद अभियानांतर्गत बचत गटाच्या माध्यमातून उपजीविका केंद्र स्थापन केले आहे. इंदुताई संतोष मुसळे, पशु सखी अश्विनी जाधव, सीआरपी दीपाली कालापाड, बचत गटातील माया जाधव आणि अर्चना मोरे यांनी ग्राम संघातून सीआयएफ निधीतून किराणा दुकान आणि दळण चक्की हा उद्योग चालू केला आहे. या माध्यमातून ते मिरची पावडर, हळद, मसाले इत्यादी वस्तू तयार करून विक्री करतात. यातून मिळणारा नफा त्यांना लाखाच्यावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी सदर महिलांचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0