विद्युत तारांच्या स्पर्शाने तनसाचा ट्रॅक्टर भस्मसात

08 Jan 2026 18:54:34
गोंदिया,
tractor fire तालुक्यातील कामठा-घाटेमणी मार्गावरील जंगीटोला शिवारात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तणस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर व तणस जळून भस्मसात झाल्याची घटना आज, ८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारात घडली. यात जीवितहाणी झाली नाही, परंतु ट्रॅक्टर मालक व शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले.
 

 tractor fire 
सुभाष फरकुंडे यांच्या शेतातील तणस घेऊन ट्रॅक्टर क्र. एमएच ३५, एडब्ल्यू ९७६७ हा कामठा ते घाटटेमणी मार्गाने जात असताना जंगीटोला शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबांवरील लोंबकळणार्‍या जीवंत वीजतारांना तणसांचा स्पर्श झाला. यात तणसला आग लागून तणस व ट्रॅक्टर जळून खाक झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु ट्रॅक्टर मालक रूपलाल पटले व शेतकरी सुभाष फरकुंडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Powered By Sangraha 9.0