वायसीसीईमध्ये आंतरराष्ट्रीय एफडीपी संपन्न

08 Jan 2026 14:18:23
नागपूर,
Yashwantrao Chavan College यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वायसीसीई), नागपूर येथील रसायनशास्त्र विभागाने ACT यांच्या सहकार्याने “Advanced Sustainable Materials” या विषयावर आंतरराष्ट्रीय एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. . या कार्यक्रमास देश-विदेशातील प्राध्यापक, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
 
 
 
phade
 
 
उद्घाटन सत्रात विभागप्रमुख व कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. प्राजक्ता वाघे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे तसेच डॉ. डब्ल्यू.बी. गुरूनले यांनी शाश्वत साहित्याचे महत्त्व आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची आवश्यकता अधोरेखित केली. Yashwantrao Chavan College या एफडीपीमध्ये भारत, चीन व मलेशिया येथील नामवंत तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. डब्ल्यू. बी. गुरूनले, डॉ. एस. आनंदन, डॉ. एम. स्वामिनाथन, डॉ. सतोश कुमार वर्मा, डॉ. एन. शिंपी व डॉ. व्ही. बालकृष्णन यांनी शाश्वत व आंतरविषयक साहित्य संशोधनातील अलीकडील प्रगतीवर सखोल व्याख्याने दिली.कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. श्रुती गोमकाळे यांनी केले.
 
सौजन्य: डॉ. राजेंद्र पहाडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0