तभा वृत्तसेवा
मारेगाव,
sexual-assault : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून सध्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी हा गावातीलच सुमारे 30 वर्षीय युवक असून तो पीडितेच्या घरी नेहमी ये-जा करत होता. नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत घरात कोणी नसताना आरोपीने वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपीने धमकी दिल्यामुळे भीतीपोटी पीडितेने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. तिच्यामध्ये होत असलेल्या काही बदलामुळे तिच्या आईने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वणी येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असता पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पीडितेने आईकडे संपूर्ण प्रकार उघड केला.
आईने तत्काळ मुलीसह मारेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम 64(2), 64(2), 65(1) तसेच झजउडज कायद्यांतर्गत कलम 3(र), 4, 5(क्ष), 5(श्र), 6 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.