युवादिनानिमित्त सोमवारी हास्य व्यंग कवी संमेलन

08 Jan 2026 20:03:30
वर्धा, 
youth-day : स्वामी विवेकानंद जयंती आणि जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवशंकर सभागृहात हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

k  
 
या कार्यक्रमात प्रसिद्ध हास्य व्यंग कवी शशिकांत यादव शशि (सबरस कवि संचालक) देवास मध्यप्रदेश, श्वेता सिंह (गीत गजल) वडोदरा गुजरात, गौरव चौहान (हास्य, वीर,) इटावा उप्र., चेतन चर्चित (हास्य कवि टीव्ही फेम) नवी दिल्ली, अमित शुला (हास्य धमाका) रीवा मध्यप्रदेश हे कवी प्रेक्षकांना आपल्या हास्य व्यंगाने लोटपोट करणार आहेत. अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री राहतील. कार्यक्रमाचे प्रवेश पत्र संस्थेच्या मुख्यालयात मिळतील. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0