कर्म, भती आणि ज्ञान यांचा समन्वय आवश्यक : पं. अग्निहोत्री

09 Jan 2026 20:16:33
वर्धा,
pt agnihotri कर्म, भती आणि ज्ञान यांचा समन्वय तसेच मनाची शुद्धी करून वैराग्य आणि विवेक विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. ते चिन्मय मिशन यात्रा या साई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर स्वामी अनुकूलानंद, स्वामी प्रत्यानंद, तारीनी चैतन्या, स्वामिनी भद्रानंद, विठ्ठल व्यवहारे, प्रदीप अग्निहोत्री, सुरेश भडांगे यांची उपस्थिती होती.
 

agnihotri 
 
पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, स्वामी चिन्मयानंद अद्वैत वेदांताचे अनुयायी होते. ज्यात ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि जग हे मायेचे भ्रम आहे. आत्मा (आत्मन्) आणि ब्रह्म यांच्यातील एकत्वावर भर देत ते म्हणत, तत्त्वमसि (तू ते आहेस) ही महावाये जीवनाचे सार आहेत. माया ही अविद्या (अज्ञान)मुळे उद्भवते, जी जीवाला सीमित वाटते; ज्ञानाने हे भ्रम नष्ट होते आणि मोक्ष प्राप्त होतो. ब्रह्म हे शुद्ध चैतन्य, सत्-चित्-आनंद स्वरूप आहे; ते काळ, कक्षा आणि कारणभूतपणे बाहेर आहे.pt agnihotri जीव आणि ईश्वर यांच्यातील फरक अविद्येमुळे आहे. वेदांत प्रज्ञा देऊन आत्मसाक्षात्कार घडवते. कर्म, भती आणि ज्ञान यांचा समन्वय आवश्यक असून मनाची शुद्धी करून वैराग्य आणि विवेक विकसित करावा, असेही पं. अग्निहोत्री म्हणाले.
Powered By Sangraha 9.0