डॉ. आंबेडकर महाविद्यालयात इंग्रजी गुणवृद्धीसाठी कार्यशाळा

09 Jan 2026 14:17:32
नागपूर,
Dr. Ambedkar College डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजच्या इंग्रजी विभागातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजी अ‍ॅज अ स्कोअर बूस्टर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांसाठी निकालाभिमुख धोरणे, प्रभावी सादरीकरण कौशल्ये आणि स्कोअरिंग तंत्र शिकवणे होता.
 
Dr. Ambedkar College
 
कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर प्रमुख उपस्थित होत्या. मागील वर्षीच्या टॉपर विद्यार्थ्यांनी संवादात्मक सत्राद्वारे इंग्रजी बोर्ड अ‍ॅक्टिव्हिटी शीट सोडवण्याचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्या, विज्ञान पर्यवेक्षक आणि विभागीय प्रभारी यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेरित केले. Dr. Ambedkar College कार्यशाळा ज्योईता रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून, तिच्या यशामागे विभागातील प्राध्यापकांचा समर्पित प्रयत्न होता.
सौजन्य: प्रफुल ब्राम्हणे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0