मोठी बातमी! महायुती अजित पवारांना 'कडू'? शरद पवारांचा घरी 'दादा' परतणार का

09 Jan 2026 14:58:50
पुणे
Supriya Sule राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदललेली दिसत आहेत. राज्य पातळीवर युती किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले अनेक पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये मात्र स्थानिक राजकीय गणितांनुसार परस्परविरोधात लढताना दिसत आहेत. त्यामुळे कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणाच्या विरोधात आहे, याबाबत मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
Supriya Sule.
या बदलत्या Supriya Sule परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यानंतर निर्माण झालेली नवी समीकरणे केंद्रस्थानी आली आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर राज्यात भाजपासोबत त्यांची युती झाली. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार हे भाजपाच्या विरोधात उमेदवारांना पाठिंबा देत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या नव्या समीकरणांचा फायदा नेमका कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार, हे 16 जानेवारी रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
 
 
 
 
सुप्रिया सुळे यांचे मत
 
 
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule. यांनी या पार्श्वभूमीवर भाजपावर जोरदार टीका केली आहे. सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ते यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांवर भाजपाकडून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, एकीकडे अजित पवारांवर टीका केली जाते आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत सत्तेत काम केले जाते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
अजित पवार यांनी केलेल्या ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील’ या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांनी नेमके काय विधान केले आहे, हे ऐकल्यानंतरच त्यावर बोलता येईल. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून, उर्वरित राज्यात स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या कुटुंबामध्ये कधीच अंतर आले नाही आणि कौटुंबिक संबंध तसेच राहिले आहेत. मात्र, राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
 
 

अजित पवार युती करणार ?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान करत काका-पुतणे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यायच्या की नाही, याचा सखोल विचार आपण अद्याप केलेला नाही; मात्र निवडणुका झाल्यानंतर याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही गट एकत्र आल्याने खालच्या पातळीवरील Supriya Sule. कार्यकर्ते समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, एवढेच मी सांगतो, असे सूचक विधान त्यांनी केले.
 
 
पुणे महापालिकेत सुरुवातीला युतीची चर्चा फिस्कटली होती; मात्र नंतर पुन्हा चर्चा होऊन युती झाली. आघाडी करताना कधी दोन पावले पुढे-मागे सरकावे लागते. आधी अपयश आले; पण नंतर पुन्हा प्रयत्न केल्यावर थोडेफार यश मिळाले, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले. पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच त्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. दहा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी पिक अवर्समध्ये दहा मिनिटे लागत होती, तिथे आता दीड तास लागत असल्याने सामान्य नागरिकांचे दररोज तीन तास वाया जात असल्याचे त्यांनी सांगितले. नुसती कामे सुरू आहेत असे सांगितले जाते; मात्र ही कामे पूर्ण कधी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
 
गेल्या पाच वर्षांत पुण्यात Supriya Sule. खड्डे बुजवण्यासाठी 1,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विकासकामांसाठी पाऊण लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यापैकी केवळ 650 कोटी रुपयेच खर्च झाले असून सुमारे 500 कोटी रुपये निधी तसाच पडून असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार गटाचे मोठे नेते पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये कमी दिसत असल्याने चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड सध्या ठाण्यात व्यस्त असून अमोल कोल्हे, नीलेश लंके यांसारखे नेते प्रचारासाठी येणार आहेत. सुप्रिया सुळे यांनीही कार्यकर्त्यांना वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.एकूणच महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, आणि मतदारांचा कौल या बदललेल्या समीकरणांना कोणती दिशा देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0