पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन करा : आ. कुणावार

09 Jan 2026 19:43:54
हिंगणघाट,
alternative water supply planning येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये. यासंबंधी अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदारांशी सविस्तर चर्चा करा. तातडीच्या उपाययोजनांसह पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन व आवश्यक ठिकाणी दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिले.
 

alternative water supply planning, Hinganghat water scarcity, 
येथील तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या संयुत वतीने आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार ९ रोजी आढावा बैठकीत ते अधिकार्‍यांना सुचना करीत होते. उपविभागीय कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत हिंगणघाट तालुयाअंतर्गत येणार्‍या सर्व गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सखोल व गावनिहाय आढावा घेण्यात आला. सर्व कामांची अंमलबजावणी ठराविक कालमर्यादेत करण्यावरही यावेळी भर देण्यात आला. याच बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचाही गावनिहाय आढावा घेण्यात आला. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याबाबत आमदार कुणावार यांनी भूमिका मांडली.
गावागावातील पाणी प्रश्न वेळेत मार्गी लावून नागरिकांना दिलासा देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून जबाबदारीने व प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परांडे, तहसीलदार योगेश शिंदे, गटविकास अधिकारी ज्ञानेश सावसाकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0