मुंबई
ambadas danve राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खडतर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर जोरदार आरोप करत म्हटले की, “हा फेक शो होता, नॉट टॉक शो, तारीख पे तारीख दिली आहे. काल गुपचूप पंप हाऊसचं उद्घाटन झालं, पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. मी माहिती घेतली आहे. पुणे आणि नागपूरमधील शो देखील पाहिले, सर्व सारखेच होते; प्रश्न विचारणारे त्यांचेच होते.” सभेत त्यांनी नको ते शब्द वापरले आणि टीकेची झोड सुरु झाली
दानवे यांनी मुंबई ambadas danve महानगरपालिकेविषयीही गंभीर विधान केले. त्यांनी म्हटले की, “३ लाख कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेला देणे बाकी आहे. फडणवीस-शिंदे यांनी मुंबईला लुटले आहे. ९३ हजार कोटींच्या डिपॉझिटचा तुटवडा झाला असून, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील.”त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर देखील टीका केली. “आम्ही आधी ५० खोके घोषणा देत होतो, आता भाजप देत आहे. परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. एमआयएम देखील सोबत आहे,” असे दानवे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या हिंदुत्व धोरणावरही त्यांनी आघाडी घेतली. “भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे,” असे दानवे म्हणाले.दानवे यांनी विकासावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही सांगितले. “मला असे वाटते की विकासावर बोलले पाहिजे. अशा गोष्टींना अर्थ नाही. लोकांच्या मनातलं विश्लेषण आम्हाला मान्य नाही. निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिल्या जातात; रिकाम्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे,” असे ते म्हणाले.
भाजपच्या कारभारावर ambadas danve टीका करत त्यांनी म्हटले की, “खोटारडेपणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे. भाजप सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही.” उदय सामंतांच्या विधानांवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा करतात. हे असत्य आहे, त्यांनी यावर स्पष्टपणे बोलावे. वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले, यावर सामंत यांनी बोलावे,” असे दानवे म्हणाले.काही विरोधकांच्या विकास कामावरून त्यांनी कटाक्ष साधला. “रावसाहेब दानवे यांनी काहीच काम केले नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले. दानवेंना चकवा म्हटले जाते. दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही. नितेश राणे विकासावर बोला. यांची जी पिलावळ आहे, राणे, साटम, झाटम, विकासावर बोला,” असे दानवे यांनी सांगितले.दानवे यांचे वक्तव्य हे राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणातील तणाव आणि पक्षांदरम्यानच्या आरोप-प्रत्यारोपांची स्पष्ट झलक देत आहे.