अनिल कांबळे
नागपूर,
engage in prostitution पतीसाेबत पटत नसल्यामुळे माहेरी आलेली महिला एका दलालाच्या जाळ्यात फसली. माहेर साेडून ती प्रियकरासाेबत राहायला लागली. प्रियकर बाहेर गेल्यानंतर ती घरातच देहव्यवसाय करीत हाेती. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा देहव्यवसाय सुरु असल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली. संशय येताच पाेलिसांनी पडताळणी करुन कारवाई केली. यात पाेलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. ममता जयंत नागवंशी (34) गुलमाेहरनगर, कळमना असे आराेपी महिलेचे नाव असून तिला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने अटक केली.
पीडित 24 वर्षीय महिला ही मुळची बुलडाणा-मेहकरची राहणारी आहे. तिला पती, मुलगा आणि मुलगी आहे. पतीसाेबत पटत नसल्याने तिने मुलाला पतीकडे साेडले आणि मुलीला घेऊन ती आपल्या माहेरी नागपुरात आली. माहेरी तिला आर्थिक अडचणी येत हाेत्या. त्यामुळे तिने मिळेल ते काम करणे सुरु केले. कपड्याच्या दुकानावर किंवा हाॅटेलमध्ये स्वयंपाक करण्याचे काम तिने केले. मात्र, आर्थिक संकट तिचा पाठलाग करीत हाेते. तिने काही दिवस कळमना मार्केट येथे काम केले. तेथे त्या महिलेची ममता नागवेशी हिच्यासाेबत भेट झाली. ममताने तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत सहजपणे पैसे कमविण्याचा सल्ला दिला आणि तिला वाममार्गाला लावले. ममताच्या माध्यमातून ती देहविक्री करीत हाेती. ममता ही त्या महिलेसाठी आंबटशाेकीन ग्राहक शाेधून आणत हाेती. गेल्या काही महिन्यांत त्यांचा व्यवसाय वाढला आणि तिच्या घरी ग्राहकांची गर्दी वाढली. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना संशय आला. त्यांनी पाेलिस निरीक्षक ललिता ताेडासे यांना माहिती दिली. त्यांनी पथकाला कामाला लावून तिच्या घरावर पाळत ठेवली.
ग्राहक येताच छापा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने एका पंटरला ममतासाेबत संपर्क करण्यास सांगितले. पंटरने 2300 रुपये देताच ममताने त्या महिलेच्या घरात पाठविले. पंटरने ममताला पैसे देताच तिने पीडित महिलेला ग्राहक असलेल्या घरात जाण्यास सांगितले. ताेच दबा धरून बसलेल्या पाेलिस पथकाने पीडित महिलेला ताब्यात घेऊन ममताला अटक केली. याप्रकरणी कळमना पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला.engage in prostitution महिला पाेलिस निरीक्षक ललीता ताेडासे यांनी व त्यांच्या सहकाèयांनी ही कारवाई केली.
प्रियकराला दिला दगा
पतीला साेडून माहेरी आल्यानंतर तिची एका युवकाशी मैत्री झाली. ताे तिच्या प्रेमात पडला. घटस्फोटित असल्याचे सांगितल्यामुळे ताे तिच्यासाेबत राहायला तयार झाला. दाेघेही पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. दाेघांचा संसार व्यवस्थित सुरु हाेता. मात्र, तिला पैसै कमविण्याची सवय पडली हाेती. त्यामुळे प्रियकर घराबाहेर पडताच ती त्याला दगा देऊन ग्राहकांना घरात बाेलवून देहव्यवसाय करीत हाेती.