रस्ते अपघातात १.५ लाख रुपयांचा ‘कॅशलेस उपचार’, पंतप्रधान मोदी सुरू करणार योजना

09 Jan 2026 11:29:11
नवी दिल्ली, 
cashless-treatment-for-road-accident देशात दरवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात घडतात. या अपघातांमध्ये सुमारे १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये अनेक असे लोक असतात, ज्यांची वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राण जातात. योग्य वेळी उपचार मिळाले तर शेकडो प्राण वाचवता येऊ शकतात. उपचारांमध्ये एक मोठी अडचण पैशांची असते. खर्च जास्त आला तर देईल कोण? अनेक वेळा नातेवाईक उपस्थित नसतात, किंवा उपस्थित असले तरी त्यांच्याकडे इतके पैसे नसतात. अशाच समस्यांवर उपाय म्हणून केंद्र सरकार लवकरच एक योजना आणणार आहे.

cashless-treatment-for-road-accident
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच देशभरातील रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना सुरू करणार आहेत. एक पायलट प्रकल्प आधीच सुरू आहे, तर पंतप्रधान मोदी लवकरच या योजनेची औपचारिक सुरुवात करतील. गडकरी म्हणाले, "रस्ते अपघातांमध्ये वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने होणारे मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे." बैठकीत रस्ते सुरक्षा, प्रवाशांची सोय, व्यवसाय करण्याची सोय आणि वाहन नियमन यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. ही योजना कोणत्याही श्रेणीतील मोटार वाहनांशी संबंधित सर्व रस्ते अपघातांना लागू होईल. cashless-treatment-for-road-accident मोटार वाहनाशी संबंधित रस्ते अपघातातील कोणत्याही बळीला योजनेच्या तरतुदींनुसार कॅशलेस उपचारांचा अधिकार असेल. कॅशलेस उपचारांमुळे रस्ते अपघातातील बळींना वेळेवर उपचार मिळतील अशी अपेक्षा आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने १४ मार्च २०२४ रोजी चंदीगडमध्ये रस्ते अपघातातील बळींना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला. नंतर हा प्रकल्प सहा राज्यांमध्ये विस्तारण्यात आला. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या "रस्ते अपघातातील बळींसाठी कॅशलेस उपचार योजना, २०२५" अंतर्गत, प्रत्येक पीडिताला अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त सात दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक अपघातात १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार दिले जातील. cashless-treatment-for-road-accident मार्च २०२४ मध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून, सुमारे २० टक्के कॅशलेस उपचार विनंत्या नाकारण्यात आल्या आहेत. लोकसभेत लेखी उत्तरात गडकरी यांनी सांगितले की, एकूण ६,८३३ उपचार विनंत्यांपैकी ५,४८० पीडितांना पात्र आढळले, तर उर्वरित प्रकरणे पोलिसांनी नाकारली. मोटार वाहन अपघात निधी अंतर्गत आतापर्यंत ७३,८८,८४८ रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0