नवी दिल्ली,
meat-to-vultures-on-january-26th राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी आकाशात होणाऱ्या एअर शोदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली वन विभागाने एक अनोखा उपाय राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विमानांच्या मार्गापासून गिधाड व इतर पक्षी दूर राहावेत यासाठी त्यांना मांस देण्याची योजना आखण्यात आली आहे.

वन विभागाकडून यंदा १,२७० किलोहून अधिक हाडरहित चिकन मांस पक्ष्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे चील आणि इतर मोठे पक्षी विमानांच्या निश्चित उड्डाण मार्गांपासून दूर, मोकळ्या जागांकडे आकर्षित होतील, असा विभागाचा अंदाज आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात नेहमीप्रमाणे जेट विमाने आणि लढाऊ विमानांचे थरारक प्रात्यक्षिक आकाशात सादर केले जाणार असल्याने पक्ष्यांमुळे होणारा धोका टाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय वायुसेनेच्या समन्वयाने दरवर्षी एअर शोपूर्वी हा उपक्रम राबवला जातो. पक्षी आणि विमाने यांच्यात होणाऱ्या धडका टाळणे हाच या सरावाचा मुख्य उद्देश आहे. meat-to-vultures-on-january-26th कमी उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी काली गिधाडसारखे पक्षी मोठा धोका ठरू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या वर्षी या उपक्रमात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या कामासाठी म्हशीचे मांस वापरले जात होते, मात्र यंदा पहिल्यांदाच चिकन मांस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. meat-to-vultures-on-january-26th वन्यजीव व्यवस्थापन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा सुरळीतपणा यामध्ये संतुलन राखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा उपक्रम १५ ते २६ जानेवारीदरम्यान शहरातील सुमारे २० ठिकाणी राबवला जाणार असून, लाल किल्ला आणि जामा मशिदीसारख्या संवेदनशील परिसरांचाही त्यामध्ये समावेश असेल. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा एअर शो कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.