शहरासह ग्रामीणमधील वाळू माफियांवर ईडीचे छापे

09 Jan 2026 14:53:14
अनिल कांबळे
नागपूर, 
ed raids गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला हाेता. पाेलिस, आरटीओ आणि महसूल विभागाच्या पथकांचा वाळू तस्करांवरील वचक संपल्यामुळे थेट अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हातात सूत्रे घेतली. शुक्रवारी पहाटे नागपूर, कामठी, सावनेरमध्ये एकाच वेळी धडक कारवाई करीत राजकीय वतुर्ळात खळबळ उडवून दिली आहे. सदर पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू स्वामित्व (राॅयल्टी) प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.
 
 

ed raid 
 
 
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एका माजी आमदाराशी संबंधित आणि गेल्या अनेक वर्षांपासून वाळू तस्करीत सक्रिय असलेल्या वाळू मािफयांच्या ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे नागपूर शहरासह परिसरातील वाळू माफियांमध्ये माेठी खळबळ उडाली आहे. या दरम्यान माेठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता, राेख रक्कम व कागदपत्रे जप्त झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एका माजी आमदाराचे निकटवर्तीय अनेक वर्षांपासून वाळू तस्करीत गुंतले हाेते. राजकीय पाठबळामुळे त्यांच्यावर कारवाई हाेत नव्हती. मात्र, काळाच्या ओघात संबंधित आमदाराचे राजकीय वजन कमी हाेत गेले. विधानसभा निवडणुकीतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षांतर्गत विराेध वाढल्यानंतर आज त्यांचेच पंटर ईडीच्या रडारवर आले आहेत.
शुक्रवार सकाळपासून नागपूर, कामठी, सावनेर तसेच भाेपाल येथे एकाचवेळी सुरू झालेल्या या छापेमारीत महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात कार्यरत आंतरराज्यीय वाळू मािफयांचे माेठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुमारे 50 हून अधिक जण या नेटवर्कमध्ये सामील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी नागपूर पाेलिसांनी या प्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली हाेती, मात्र त्यातून काेणतीही ठाेस कारवाई पुढे आली नव्हती.ed raids वाळू माफियांच्या बेकायदेशीर कारभारामुळे शासनाचे काेट्यवधी रुपयांचे महसूल नुकसान हाेत आहे. माेठ्या महसूल गैरव्यवहाराच्या संशयावरून ही ईडीची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच या छापेमारीचे नेतृत्व केले आहे. या कारवाईतून अनेक धक्कादायक बाबी समाेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0